*औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क*
*रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष उपाययोजना; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर*
गडचिरोली, (जिमाका) दि.18 : ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात बुधवार, दिनांक 20 मे 2026 रोजी संपूर्ण भारतभर किरकोळ व घाऊक औषध व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत मिळावा आणि रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांशी वैयक्तिक स्तरावर संपर्क साधून नियोजित बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन सातत्याने सुरू ठेवले आहे. तसेच बंदच्या काळात काही औषध दुकाने सुरू राहतील याची दक्षता घेण्याबाबत संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत औषधांची आवश्यकता भासल्यास नागरिकांनी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी औषध निरीक्षक श्रीमती नालंदा उरकुडे (मो. 9096414104) तसेच सहायक आयुक्त (औषधे) श्री नीरज लोहकरे (मो. 7276544972) यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत :
सिरोंचा – 9421729671
भामरागड – 9404438383
एटापल्ली – 9421856516
आलापल्ली – 9421729384
अहेरी – 9767820220
मुलचेरा – 9421854819
आष्टी – 9422151299
चामोर्शी – 9588678242
गडचिरोली – 9421735620 / 9423422130
आरमोरी – 9403820216 / 9420973680
वडसा – 9422150640 / 8999362844
कुरखेडा – 9404831332
कोर्ची – 9422154766 / 7757005944
धानोरा – 7588772743
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, अत्यावश्यक परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक सेवा घ्याव्यात, असे सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन, गडचिरोली श्री नीरज लोहकरे यांनी म्हटले आहे।



