गडचिरोलीत काँग्रेसचा शक्तिप्रदर्शन मेळावा; विश्वजीत कोवासे यांच्या पदग्रहणाला दिग्गज नेत्यांची उपस्थिती
26 मे रोजी धानोरा रोडवर भव्य शेतकरी मेळावा व पदग्रहण सोहळा
गडचिरोली : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवार, 26 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता धानोरा रोडवरील सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्या घरासमोरील प्रांगणात भव्य शेतकरी मेळावा तसेच नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या पदग्रहण सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार अध्यक्षस्थानी राहणार असून अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेते उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात खासदार नामदेव किरसान, माजी खासदार मारोतराव कोवासे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, आमदार रामदास मसराम, विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
सत्कारमूर्ती म्हणून नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विश्वजीत मारोतराव कोवासे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
या मेळाव्यास काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, NSUI, सेवादल तसेच विविध फ्रंटल संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.





