जैरामपूर येथे आरोग्य शिबिर सूरू करा: -श्री हरीष निखाडे माजी उपसरपंच जैरामपूर
चामोर्शी :- तालुक्यातील जयरामपुर येथे गेल्या पंधरा वीस दिवसापासून संसर्गजन्य तापाची सात आहे सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे त्यात अशा प्रकारची साथ गावात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे जयरामपूर परिसरात तापाची साथ असल्याने काही नागरिक उपचारासाठी रुग्णालयात जात आहे पण कोरोणा चाचणी होईल आणि आपल्याला कोरोना पेशंट मध्ये गणले जाईल या भीतीने अनेक नागरिक रूग्णालयात जाणे टाळत आहेत तर काही नागरिकांकडे साधने नसल्याने दवाखान्यापर्यंत जाऊ शकत नाही
काही लोकांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने ते खाजगी रुग्णालयात जाऊ शकत नाही करिता आरोग्य विभागाने ह्या समस्येची दखल घ्यावी अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गावात आरोग्य शिबिर सुरू करावे अशी मागणी माजी ग्रामपंचायत उपसरपंच श्री हरीश निखाडे यांनी केली आहे