गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
* जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तकेंद्र, गडचिरोली आणि उप-जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र, अहेरी यांच्या सहकार्याने एकूण 03 ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन
* पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे 170, उपमुख्यालय प्राणहिता येथे 228 व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सिरोंचा येथे 105 असे एकूण 503 रक्तदात्यांनी केले रक्तदान
* एकूण 06 रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून आजपर्यंत 4864 रक्तदात्यांनी केले रक्तदान
सन 2004 पासून 14 जून हा दिवस जगभरात रक्त आणि रक्ताची आवश्यकता, त्याची मागणी व त्याचा गरजेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि रक्तदात्यांचा सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तकेंद्र, गडचिरोली आणि उप-जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र, अहेरी यांच्या सहकार्याने पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील पांडू आलाम सभागृहामध्ये तसेच उप-मुख्यालय प्राणहिता व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिरोंचा येथे ‘रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरामध्ये अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. हर्षवर्धन बी.जे. उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा श्री. संदेश नाईक तसेच विविध शासकिय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचेसह गडचिरोली पोलीस दल, सिआरपीएफ, एसआरपीएफचे पोलीस अधिकारी व अंमलदार, यासोबतच पोस्टे/उप-पोस्टे/पोमकें स्तरावरुन आलेल्या नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवून “रक्तदान हेच श्रेष्ठदान” ही सामाजिक भावना उराशी बाळगुन एकूण 503 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरादरम्यान पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांनी सांगितले की, गडचिरोली पोलीस दलामार्फत आयोजित आजपर्यंत एकूण 06 रक्तदान शिबिरांदरम्यान आतापर्यंत एकूण जवळपास 4864 युनिट रक्ताचे रक्तदान करण्यात आले आहे. ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानाने आपल्याला मिळत असते. तसेच समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने आपण सर्वांनी किमान तीन महिण्यातून एक वेळा तरी रक्तदान करणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. यासोबतच सदरवेळी रक्तदानामध्ये सहभाग नोंदवणारे अधिकारी, अंमलदार यांना पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. सदर विविध ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरापैकी गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट 3030 येथील टीमने तसेच पोलीस उप-मुख्यालय अहेरी (प्राणहिता) येथे शालिनीताई मेघे रक्तकेंद्र नागपूर येथील टीमने तसेच सिरोंचा येथे उपजिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र अहेरी येथील टीम उपस्थित राहुन रक्त संकलन करण्याचे काम केले व रक्तदान शिबिराला सहकार्य केले.
सदर आयोजित रक्तदान शिबिरात पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, सहाय्यक पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, गडचिरोली श्रीमती डॉ. छाया ऊईके, मुख्य वैद्यकीय अधिकारी पोलीस रुग्णालय, गडचिरोली श्री. सुनिल मडावी, ट्रायबल वेलफेअर कमिटी इंटरनॅशनल, नागपूरचे डिस्ट्रीक्ट चेअरमन श्री. राजीव वरभे, विशेष कार्यकारी अधिकारी, शालीनीताई मेघे रक्तपेढी नागपूर श्री. अश्विन रडके हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उप-पोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे पोउपनि. चंद्रकांत शेळके, पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. नरेंन्द्र पिवाल, जनसंपर्क शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. प्रतिक भदाणे व सर्व शाखांचे अधिकारी आणि अंमलदार तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या संपूर्ण टिमने अथक परिश्रम घेतले.





