आता उरल्या फक्त आठवणी जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे एटापल्ली युवा प्राध्यापक जगदीश गावराने यांचा कोरोनाने घेतला बळी

527

आता उरल्या फक्त आठवणी
जिल्हा परिषद हायस्कुल तथा
कनिष्ठ महाविद्यालयाचे युवा प्राध्यापक जगदीश गावराने यांचा कोरोनाने घेतला बळी

एटापल्ली: जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालया एटापल्लीचे युवा व मनमिळाऊ, प्रेमळ ,हसतमुख असणारे प्राध्यापक जगदीश गावराने वय 32 यांचे आज सकाळी 10 वाजताचे दरम्यान कोरोनाने दुःखद निधन झाले.
प्राध्यापक जगदीश गावराने हे कुरखेडा तालुक्यातील चिचाळा येथील रहिवासी आहेत ते साधारण परिवारातील असून ते चार वर्ष्यापूर्वी जिल्हा परीषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे रुजू झाले.ऐन उमेदीच्या काळात ते आपल्या परिवार मित्र मंडळीतून निघून गेल्याने एटापल्ली सहीत कुरखेड्या तालुक्यात दुःख व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या मागे पत्नी,आई, वडील, भाऊ, वहिनी व खुप मोठा आप्तपरिवार आहे.