देसाईगंज येथील अवेद्य कोरोना सेंटर वर प्रशासकीय कार्यवाही सुरू
देसाईगंज (वार्ता) :- स्थानिक कब्रस्तान रोड अर्ध सैनिक कँटीन समोर डॉ. मनोज बुध्दे यांचे दवाखाना तसेच गांधी वार्ड येथील बनसोड हॉस्पिटल येथे अवेद्य रित्या कोरोना संसर्ग, पॉजिटीव्ह रुग्णांना भर्ती करवून त्यांचे कडून लाखो रुपए उकडत असल्याची माहिती प्रशासनाला मिळताच स्थानिक प्रशासना कडून अवेद्य कोरोना सेंटर वर धाड टाकून हॉस्पिटल ची चौकशी सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. विशेष म्हणजे दोन्ही रुग्णालयात कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण मिळ्याल्याची माहीती. कारवाईत महसूल, नगर पालिका, पोलीस व तालुका आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे समजते.