वडसा: आरमोरी परिसरातील अचानक आलेल्या गारपिट मूळे शेतकऱ्यांचे हातात आलेल्या धान पिकाचे नुकसान।।। पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावे।।।।।
काल रात्री 9 वाजता अचानक आलेल्या गारपीट मुळे हातात आलेल्या धान पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले 5o टक्के धानाच्या दाणे लोम्ब गडुन
पडले या बाबतची माहिती कुरुड येथील शेतकरी श्री शिवणकर यानि माजी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिह चंदेल याना दिली लगेच सुरेंद्रसिह चंदेल माजी जिल्हा प्रमुख हे वडसा तालुक्यातील कुरुड जवडील वडे गाव रिठ। येथील शिवणकर व दिगंबर मेश्राम यांच्या शेतात माजी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिह चंदेल माजी उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम हे शेतात जाऊन प्रत्येक्ष पाहणी केली यात धान पिकाचे 50 टक्के नुकसान झाल्याचे दिसले तसेच आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा पथरगोटा परिसरातील धान पिकाचे तसेच फळ बागांचे नुकसान झाले पूर्वीच विद्युत पुरवठा कमी मिळत असल्याने नुकसान झाले आता निसर्गाने नुकसान केल्याने शेतकरी चिंतातुर होऊन कपाळावर हात देऊन बसला आहे तरी वडसा तालुक्यातील आरमोरी तालुक्यातील गारपीट ग्रस्त गावातील शेतीची पाहणी करून पंचनामा करावे शेतकऱ्यांना4० हजार रुपये प्रति एकर मदत करावी अशी मागणी माजी जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिह चंदेल माजी उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम अनिल उईके यांनी केली आहे