५० हजार ते १ लक्ष रुपयापर्यंतचे कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांना ना-देय (No-Dues) प्रमाणपत्राची अट तातडीने रद्द करा
आमदार डॉक्टर देवरावजी होळी
मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, अर्थमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री ना. दादाजी भुसे,जिल्ह्याचे पालक मंत्री ना. एकनाथजी शिंदे व जिल्हाधिकारी गडचिरोली व एल डी एम अग्रणी बँक गडचिरोली यांच्याकडे मागणी
नादेय (No-Dues) प्रमाणपत्रा करिता शेतकऱ्यांना सर्व बँकांचे झिजजावे लागतात उंबरठे
कोरोना सारख्या महामारीत बँकांनी व सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊ नये
गडचिरोली:– ५० हजार ते १ लक्ष रुपयापर्यंतचे कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेकडून वा सहकारी संस्थामार्फत मागण्यात येणाऱ्या ना-देय (No-Dues) प्रमाणपत्राची अट तातडीने रद्द करावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी शासनाला पत्राद्वारे केली आहे.
आरबीआय बँकेने सर्व बँकांना ५० हजार वरील पीक कर्ज देताना शेतकऱ्यांकडून अन्य बँकांचे कोणत्याही प्रकारचे ना-देय (No-Dues) प्रमाणपत्र घेण्यात येऊ नये असे निर्देश दिलेले असतानाही गडचिरोली जिल्ह्यातील अनेक बँकांनी व सहकारी संस्थांनी (सोसायटी) शेतकऱ्यांकडून कर्जाची मागणी होताना अन्य बँकांचे ना-देय प्रमाणपत्र आणण्याचे सांगितले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कोरोना सारख्या महामारीत अन्य बॅंकांचे उंबरठे झिजवावे लागत असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे त्यामूळे शासनाने तातडीने शेतकऱ्यांकडून मागण्यात येणाऱ्या या ना देय प्रमाणपत्राची अट रद्द करावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, वित्तमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री ना. दादाजी भुसे,जिल्ह्याचे पालक मंत्री ना. एकनाथजी शिंदे व जिल्हाधिकारी गडचिरोली व एल डी एम अग्रणी बँक गडचिरोली यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे