पालकमंत्री विजय वडेट्टिवार यांच्या कडून रुग्णांच्या सेवेत मोफत रुग्णवाहीका दाखल

164

पालकमंत्री विजय वडेट्टिवार यांच्या कडून रुग्णांच्या सेवेत मोफत रुग्णवाहीका दाखल
ब्रह्मपुरी:- 
सध्या सर्वत्र कोरोना विषाणुने थैमान घातले. रुग्णांची संख्या वाढत आहे. वैद्यकीय साधनांची कमतरता भासत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. रुग्णांची ही अडचण लक्षात घेता ब्रम्हपुरी तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी ने-आण करण्यासाठी राज्याचे मदत,पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.विजय वडेट्टिवार यांच्या कडुन रुग्णांच्या सेवेत मोफत रूग्णवाहीका दाखल करण्यात आली आहे.
ही रुग्णवाहीका पालकमंत्री विजय वडेट्टिवार यांच्या ब्रम्हपुरी शहरातील कार्यालयाजवळ उपलब्ध असुन गरजूंनी सदर रुग्णवाहिकेचा लाभ घ्यावा.
रुग्णवाहिकेच्या उपलब्धतेसाठी तालुका काँग्रेस कमेटिचे अध्यक्ष खेमराज तिडके, नगरपरीषद गटनेता विलास विखार, जि. प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, नगरसेवक हितेंद्र राऊत, अमोल सलामे यांच्या सोबत संपर्क साधावा.