या कोरोना प्रादुर्भावाच्या कठीण काळात जनतेच्या सेवेत तत्पर असणारा जनसेवक सुरेंद्र भाऊ चंदेल……..
गडचिरोली:- कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत असताना या संकटसमयी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जनसेवेसाठी झटणाऱ्यांची संख्या मात्र बोटावर मोजता इतकी आहे.अशा कठीण परिस्थितीत कोणतेही पद नसताना कोरोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, वडसा, कुरखेडा, कोरची या तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या मदतीसाठी अहोरात्र झटणारे एक नाव म्हणजे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल.
उत्तर गडचिरोलीत कोरोनाच्या या बिकट परिस्थितीत संकटग्रस्त जनतेच्या मदतीसाठी जमिनीवर उतरून जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून आपले कार्य करीत आहे.कुरखेडा तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता 100 बेडचे कोविड सेंटर उभारा न उभारल्यास आंदोलनाचा इशारा देताच त्वरित 50 बेड्सचे कोविड सेंटर मंजूर करवून घेतले.इतकेच नव्हे तर कुरखेडा रुग्णालयाला 100 पेक्षा जास्त ऑक्सिजन ची व्यवस्था केली. व व्यापाऱ्यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त सिलेंडर पुरविण्याच्या कामात ते व्यस्त आहे.स्वतः पुढाकार घेऊन आरमोरी येथील रुग्णालयात 25 ते 50 ऑक्सिजनची व्यवस्था केली. खरे तर खासदार,आमदारांना लाजवेल असे कार्य या परिसरात सुरेंद्र चंदेल करीत आहे. या कोव्हिडं च्या काळात अनेक राजकीय नेते, लोकप्रतिनिधी घरात बसून असताना भाऊ मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अविरत कोरोनाबधितांच्या सेवेत अग्रेसर आहे.याही परिस्थितीत कुठे एखादी अपघाताची बातमी समजताच सुरेंद्र चंदेल त्वरीत त्याच्या मदतीसाठी धावून जाताना जनतेने बघितले आहे.या परिसरातील जनतेच्या मनात संकटसमयी मदतीसाठी धावून येणारा देवदूत अशी भाऊंची प्रतिमा आहे.आणि भाऊ या कठीण काळात आपली लोक संकटात सापडली असताना मदतीसाठी अहोरात्र झटत आहे.
जेव्हा जेव्हा एखादे संकट आले तेव्हा बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक मदतीसाठी धावून गेल्याचे आपणास पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यतील पदे भोगणारे पक्षाचे चमकोगिरी करणारे पदाधिकारी भूमिगत झाले असताना आपले जिवाभावाच्या शिवसैनिकाना सोबत घेऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबधित रुग्णांच्या मदतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या सुरेंद्र भाऊ चंदेल यांचे आभार मानावे तितके कमी.







