आय सी आय सी आय बँकेकडून गडचिरोली जिल्हयासाठी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

171

आय सी आय सी आय बँकेकडून गडचिरोली जिल्हयासाठी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

गडचिरोली, दि.11 मे :- रुग्णसेवेच्या दृष्टीने आयसीआयसीआय बँकेने आपल्या सीएसआर फंडातून गडचिरोली आरोग्य विभागासाठी दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हाधिकारी दीपक सिंगलस यांचेकडे भेट दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष गुप्ता, आयसीआयसीआय बँकेचे विभागीय प्रमुख विवेक बल्की, गडचिरोली शाखेचे व्यवस्थापक प्रविण विपट, शासकिय रीलेशनशीप मॅनेजर आशिष खोब्रागडे उपस्थित होते. सद्या झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना संसर्गासोबत ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे. ज्यामुळे, ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा काही प्रमाणात भासतोय. ही उणीव भरून काढण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन गडचिरोली साठी भेट देण्यात आली. प्रशासनाकडून जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी बँकेचे विभागीय प्रमुख विवेक बल्की व आयसीआयसीआय बँकेचे आभार मानले.