शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार यांच्याकडून शिवसेना तालुका प्रमुख (ग्रामीण) नुकूमजी गट्टू कुटुंबियांचे सांत्वन

136

राजगोपालजी सुल्वावार यांनी सोमवार ला कासरपल्ली येथे जाऊन स्व.नुकूमजी गट्टू यांच्या कुटुंबियांचे घरी जाऊन सांत्वन केले

सिरोंचा:- 
शिवसेना तालुका प्रमुख सिरोंचा (ग्रामीण) स्व.नुकूमजी गट्टू यांचे रविवार ला दुःखद निधन झाले.
दिनांक 10.05.2021 रोजी सोमवार ला कासरपल्ली येथे स्व.नुकूमजी गट्टू यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
सिरोंचा तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणारे स्व.नुकूमजी गट्टू हे शिवसेनेचे जेष्ठ तडफदार नेते होते.
त्यांच्या निधनाने पक्षाला फार मोठा धक्का बसला.
गेल्या महिन्यात 9 तारखेला आमची शेवटची भेट झाली.आज ते नसले तरी स्व.नुकूमजी गट्टू हे कायम स्मरणात राहील व त्यांना शिवसेना गडचिरोली जिल्हा व सर्व पदाधिकारी,शिवसैनिक कडून भावपूर्ण श्रद्धांजली….!!

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अहेरी (ग्रामीण) सुभाषजी घुटे,वेंकटेश कंदीवार,महेंद्र सुल्वावार हे उपस्थित होते.