धोडराज या परिसरातील नागरिकांशी तेंदूपत्ता संकलनावर चर्चा करतांना शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार
धोडराज,(भामरागड)
महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब व गडचिरोली जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख मा.किशोर पोतदार साहेब व तसेच माजी आमदार तथा गडचिरोली जिल्ह्याचे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख मा.रामकृष्णजी मडावी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
दिनांक १२-०५-२०२१ रोजी बुधवार ला भामरागड तालुका दौऱ्या दरम्यान धोडराज या परिसरातील 25 ते 30 गावातील नागरिक सोबत तेंदूपत्ता संकलनावर चर्चा केली असता शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सदस्य, जिल्हा नियोजन समिती गडचिरोली मा.राजगोपालजी सुल्वावार यांना धोडराज या परिसरातील नागरिकांनी सांगितले की चार ग्रामपंचायतीचे तेंदूपत्ता लिलाव न झाल्याने नागरिकांना रोजगारापासून वंचित राहावे लागणार आहे तरी येथील लाहेरी,मल्लमपोडर,होडरी,धिरंगी या चार ग्रामपंचायत मध्ये संबंधित तेंदूपत्ता ठेकेदाराने लिलाव करून येथील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी उपस्थित नागरिकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार यांच्या कडे केली आहे.
यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हाप्रमुख रियाज भाई शेख,अहेरी विधानसभा संघटक बिरजुजी गेडाम,शिवसेना तालुका प्रमुख अहेरी (ग्रामीण) सुभाषजी घुटे,शिवसेना तालुका प्रमुख भामरागड खुशालजी मडावी,शिवसेना शहर प्रमुख नासीरजी शेख,वेंकटेश कंदीवार,महेंद्र सुल्वावार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







