सर्व सामान्य माणसाचा डॉक्टर आज देसाईगंज वासीयांनी गमावला

246

सर्व सामान्य माणसाचा डॉक्टर आज देसाईगंज वासीयांनी गमावला

डॉ०महेश् पापडकर् यांचे दुःखद निधन

देसाईगंज:-  सर्व सामान्याचा डॉक्टर म्हणून परिचित असलेले तसेच माजी नगराध्यक्ष डॉ० महेश पापडकर यांचे आज दुपारी 4.00 वाजताच्या सुमारास नागपूर येथील दवाखान्यात उपचारा दरम्यान निधन झाले .
त्यांच्या निधनाची बातमी कळताच देसाईगंज शहरात हळहळ व्यक्त होत आहे .
एक खरा डॉक्टर कसा असावा ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉ० पापडकर होते. त्यांच्या जाण्याने शहराचे अकल्पित नुकसान झाले आहे , मृदू स्वभाव आणि योग्य बोलीभाषा यामुळे त्यांचाकडे आसपास च्या परिसरातील सुद्धा लोक तपासणीसाठी येत होते , अशा या परिस्थितीत त्यांच्या परिवाराला या दुःखातुन् सावरण्याची शक्ती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि देसाईगंज वासीयांकडुन भावपुर्ण श्रध्दांजली .