अनखोडा येथे वादळी पावसामुळे घरांचे झाले अतोनात नुकसान.

151

आष्टी-
काल रात्रीच्या सुमारास आष्टी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आला.यात शेतमाल व घरांचे अतोनात नुकसान झाले.अनखोडा येथील उपसरपंच अरुण चहारे यांच्या घरांची छपरे उडाली.सोबतच नवीन बांधकाम सुरू असलेल्या घराचे नुकसान झाले. किमान 40 हजार रुपयांचे त्यांचे नुकसान झाले.इतरही घराचे या वादळी पावसामुळे नुकसान झाले.अनेक शेतकऱ्यांचा उघड्यावर ठेवलेला मकाही भिजला.शेतकऱ्यांवर व गरीब कुटूंबावर ओढवलेल्या अस्मानी संकटामुळे त्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.