माजी जिल्हाप्रमुख विजय शृंगारपवार यांचा पुढाकार
“जनसेवा हीच ईश्वर सेवा”
गडचिरोली –
शिवसेना गडचिरोली तर्फे जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे कोविड-१९ ने भरती असलेल्या रुग्णाचा २०० च्या वर नातेवाईकाना चहा- बिस्कीट व नास्ता नि:शुल्क वाटप आज दिनांक- १५ मे २०२१ ला सकाळी ८ वाजता वाटप करण्यात आले. पहिल्याच दिवशी झालेल्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले आहे.
चहा-बिस्कीट आणि नास्ता वाटप आयोजन मा.ज़िल्हाप्रमुख विजय शृंगारपवार यांनी केले.
विशेष हे की यावेळी आमगाव जिल्हा गोंदिया येथील एका कोवीड ने मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या नातेवाईकानी शहराबद्धल अज्ञात असल्यामुळे शिवसेने कडे अंत्यसंस्कार करिता मदत मागितली. त्यांना शिवसेने सहकार्य क़ेले.
अनेक रुग्णाचे नातेवाईक हे मदत मागत होते त्यांना शिवसैनिकांनी सहकार्य केले आहे.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजूभाऊ कावळे,संघटक नंदू कुमरे,उदय धक्काते,तालुकाप्रमुख गजानन नैताम महिला उपसंघटिका अश्विनीताई चौधरी,शिव शृंगारपवार यांनी आज उपस्थित राहून चहा- बिस्कीट व नास्ता वाटप करण्याकरीत सहकार्य केले.







