गडचिरोली:- शेतकऱ्यांचे धानाची उन्हाळी फसल निघाली आहे व मळनी(चूर्णा) होऊन दहा ते पंधरा दिवस झालेलें आहे खरेदी केन्द्रात धान विकुन शेतकऱ्यांना लोकांची व्यापाऱ्यांची आर्थिक देने घेणे करायचे आहे भविष्यातले अर्थीक नियोजन करायचे आहे तसेच शेतकऱ्यांना पैशाची फार आवश्यकता आहे तसेच धान खरेदी केंद्र उशिरा सुरू झाल्यास व्यापारी कमी भावात धान खरेदी करतील यात शेतकऱ्यांचे फार नुकसान होणार आहे तरी आदिवासी महामंडळ ने येत्या चार पाच दिवसात जिल्हातील सर्वच धान खरेदी केंद्र सुरू करावे अन्यता शेतकऱ्यांचा उपस्थितीत तीव्र आंदोलन करून जिल्हा आदिवासी महामंडळ कार्यालया ला ताला ठोकण्यात येइल असा इशारा शिवसेना माजी महिला संघटिका तथा माजी बांधकाम सभापती छाया कुंभारे यांनी दिला आहे