महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम गडचिरोली येथे किराणा किट व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसचे सचिव अतुल मल्लेलवार यांचा पुढाकार
गड्चिरोली:- येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने गरजु वृद्धाना मदतीचा हात म्हणून किराणा किट वाटप करण्यात आले.
ना.श्री विजय वडेट्टीवार , युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत दादा तांबे व युवक कॉग्रेस च्या प्रदेश महासचिव शिवानीताई वडेटीवार यांच्या सूचनेनुसार युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार यांच्या सहयोगाने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तर्फे गड्चिरोली येथे मातोश्री वृद्धाश्रम येथे ग़रज़ु वृद्ध मातांना
मदत किट चे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव
अतुल मल्लेलवार , युवक काँग्रेस चे कार्यकर्ता विक्की निक़ोसे , आकाश बोलुवार,स्वप्निल घोसे,कल्पक मुप्पीडवार,आकाश वाढई,मिथुन ग़ेडाम,सुनील कोतकोंडावार,जावेद खान उपस्थित होते.







