पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चकमकीत सामील जवानांचे अभिनंदन

171

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चकमकीत सामील जवानांचे अभिनंदन

गडचिरोली:- जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात कोटमी गावाच्या आउटपोस्टच्या हद्दीमध्ये झालेल्या पोलीस सी -60 जवानासोबत झालेल्या चकमकीत 13 जहाल नक्षलवाद्यांना ज्यांच्यावर शासनाने मोठे बक्षिस जाहीर केलेले होते त्यांना कंठस्नान घालण्यात सी 60 जवानांना यश मिळाले. मी डिआयजी संदिप पाटील, एसपी अंकित गोयल, तसेच अतिरिक्त एसपी व सी-60 तील जवान व पोलीस यांचे मनापासून अभिनंदन करतो असे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गौरवोद्गार काढले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पोलीसांनी कंबर कसली असून त्याचाच हा एक भाग म्हणून आज पहाटे 13 नक्षलवाद्यांचा सी -60 जवानांकडून खात्मा करण्यात आला आहे. मी पुन्हा एकदा या चकमकीत शामील असलेल्या सर्व जवानांचे मनापासून अभिनंदन करतो असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरवोद्गारे काढले.