पोलीस-नक्षल चकमकीतील मृत १३ नक्षल्यांची ओळख पटल
●६० लाखांचे होते बक्षीस.
गडचिरोली : उपविभाग एटापल्ली अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र कोटमी हद्दीत पैडी जंगल परिसरा आज २१ मे रोजी सकाळच्या सुमारास घडलेल्या चकमकीत १३ नक्षलींना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले. त्या १३ मृत नक्षलींची ओळख पटली असून त्यात ६ पुरूष व ७ महिला नक्षलींचा समावेश आहे.
यामध्ये १) नंदिनी उर्फ प्रेमबत्ती मडावी कसनसूर एलओएस दलम मध्ये एसीएम पदावर कार्यरत होती तिच्यावर शासनाने ६ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
२) सतीश उर्फ अडवे देवु मोहंदा हा कंपनी क्रमांक ४ दलम मध्ये डीव्हिसीएम पदावर कार्यरत होता त्याच्यावर शासनाने १६ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
३) किशोर उर्फ शिवा उर्फ शिवाजी बारसु गावडे हा कंपनी क्रमांक ४ दलममध्ये पीएम पदावर कार्यरत होता त्याच्यावर शासनाने ४ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
४) रूपेश उर्फ लींगा मस्तारी गावडे हा कसनसूर एलओएस दलममध्ये उपकंमाडर पदावर होता त्याच्यावर शासनाने ६ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
५) सेवंती हेडो ही कसनसुर एलओएस दलममध्ये पीएम पदावर कार्यरत होती तिच्यावर शासनाने २ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होेते.
६) किशोर होळी हा पैदी एरीया दलममध्ये जनमिलीशिया पदावर कार्यरत होता त्याच्यावर २ लाख रूपयांचे बक्षीस शासनाने जाहीर केले होते.
७) क्रांती उर्फ मैना उर्फ रीना माहो मट्टामी ही कसनसूर एलओएस दलममध्ये पीएम पदावर कार्यरत होती तिच्यावर २ लाखांचे बक्षीस शासनाने जाहीर केले होते.
८) गुनी उर्फ बुकली धानु हिचामी ही कंपनी क्रमांक ४ दलममध्ये पिपिसीएम पदावर कार्यरत होती तिच्यावर शासनाने ४ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
९) रजनी ओडी ही कसनसुर एलओएस दलममध्ये पीएम पदावर कार्यरत होती तिच्यावर २ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
१०) उमेश परसा हा कसनसुर एलओएस दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता त्याच्यावर शासनाने ६ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
११) सगुना उर्फ वसंती उर्फ वत्सला लालु नरोट ही चातगांव दलम मध्ये कार्यरत होती तिच्यावर शासनाने २ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
१२) सोमरी उर्फ सुनिता उर्फ सविता पापय्या नैताम ही कसनसुर एलओएस दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती तिच्यावर शासनाने ६ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
१३) रोहीत उर्फ मनेश उर्फ मानस उर्फ सोनारू सन्नु कारामी हा कसनसुर एलओएस दलममध्ये पीएम पदावर कार्यरत होता त्याच्यावर शासनाने २ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
वरील मृतक नक्षल्यांवर एकुण ६० लाखांचे बक्षीस शासनाने जाहीर केले होते. मृतक नक्षल्यांवर खुन, जाळपोळ, चकमक इत्यादी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तसेच यात १ नग एके ४७, रायफल, ५ नग एसएलआर रायफल, स्टेनगन १ नग, ३ नग ३०३ रायफल, ८ एमएम बंदुक २ नग, १ नग पिष्टल इत्यादी भरपूर प्रमाणात स्फोटके मिळुन आले. तसेच नक्षल्यांचे दैनंदिन जिवनात वापरात येणारे साहित्य मिळुन आले.
सी-६० कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कौतुक केले आहे. यावेळी राज्याचे विशेष अभियान अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक संदिप पाटील , पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक मनीष कलवानीया , अपरर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक सोमय मुंडे उपस्थित होते तसेच पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी नक्षल विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले.







