आमदार डॉ देवराव होळी यांच्या पाठपुराव्यास यश.
गडचिरोली:- जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या व जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून चामोर्शी तालुक्याची ओळख आहे चामोर्शी शहरात मुख्य मार्गाचे काम व याच मुख्य मार्गाला दोन्ही बाजूने नालीचे बांधकाम जोमाने सुरू आहे. महामार्गावरील अनेक ठिकाणी छोटा पुलाचे बांधकाम सुद्धा सुरू आहे तसेच शहरातील विविध प्रभागात विविध विकास कामे सुरू आहेत त्यातच आता शहरातील या मुख्य राष्ट्रीय महामार्ग शहरातील शिवाजी हायस्कूल ते आष्टी रोड दिना क्यानल नव निर्माणधिन पुलीया पर्यंत फोर लेन रस्ता मंजूर करण्यात आला आहे.
तसेच या रोडवर डीवायडर सुद्धा मंजूर करण्यात आले आहे यामुळे सदर काम झाल्यानंतर चामोर्शी शहराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडणार आहे यामुळे नगर पंचायत चामोर्शीची थेट शहरीकरणा कडे वाटचाल होईल चामोर्शी शहराचे रहिवाशी आमदार डॉ देवराव होळी यांच्या पुढाकाराने आधीच शहरातील प्रमुख जोडणारे रस्ते व नालीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
शहरात मुख्य ठिकाणी विविध प्रलंबित विकास कामांना प्राधान्य
देऊन तमाम विकास पावसाळा पूर्वी पूर्ण करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत
सदर राष्ट्रीय महामार्ग वरील नव्याने तयार होत असलेल्या फोरलेन रस्ता व डिवायडर मंजुरी करिता आमदार डॉ देवराव होळी सतत पाठपुरावा करीत होते शेवटी त्यांच्या या पाठपुराव्यामुळे सदर काम मंजूर करण्यात आले याबद्दल केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता मिश्रा साहेब
यांचे आमदार डॉ देवराव होळी यांनी जाहीर आभार मानले







