नवेगाव व पुलखल येथील ग्रामपंचायत मध्ये वृक्षारोपण
गडचिरोली : केंद्रीय मंत्री विकास पुरुष मा.नितीनजी गडकरी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णाच्या नातेवाईकाना मा.रामदासजी आंबटकर मा. संगटनमंत्री भाजप महाराष्ट्र प्रदेश तथा विधान परिषद सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली नास्ता,सयानिटायजर,मास्कचे वाटप करण्यात आले.त्यानंतर नवेगाव व पुलखल येथील ग्रामपंचायतमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, अनिल पोहनकर, अविनाश महाजन,श्रीकांत पतरंगे,सागर कुमरे, नवेगावचे उपसरपंच राजू खंनगार पुलखलच्या उपसरपंच रूमनबाई ठाकरे, विनोद देवोजवार, राकेश राचमलवार, कुशाल पाटील ठाकरे उपस्थित होते.