गडचिरोली जिल्ह्यातील दुकाने सुरू करण्यासाठी व्यापारी संघटनेचे आमदार डॉ देवराव जी होळी याना निवेदन

170

आमदार डॉ देवरावजी होळी यांची व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घेवून जिल्हाधिकारी यांचेशी सकारात्मक चर्चा

सोमवार केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार तर आठवड्यातून दोन- दोन दिवस ठराविक दुकाने सुरू करण्यास परवानगी देणार

गडचिरोली:- 

मागील जवळपास दीड महिन्यांपासून जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू असुन लहान लहान दुकानासह मोठ्या व्यवसायांचे देखील मोठे नुकसान होत आहे त्यामुळे शासनाने काही अटी शर्तिंवर दुकान सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी विनंती आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात गडचिरोली व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे त्यावरून मा जिल्हाधिकारी यांनीमाननीय जिल्हाधिकारी यांनी उद्यापासून आठवड्यातून दोन दोन दिवस ऑड-इन-वन पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले
कोविड-19 च्या महामारीमूळे संपूर्ण राज्यात एप्रिल पासून लॉकडाऊन लावण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यातील संपूर्ण दुकान बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लहान लहान व्यवसायांवर मोठा विपरीत परिणाम होत असून असंख्य लोकांवर उपासमारीची पाळी आलेली आहे . त्यातच मोठ्या व्यवसायांवर गंभीर परिणाम होत आहेत .त्यामुळे सर्व व्यापारी संघटनेच्या माध्यमातून आमदार डॉ देवरावजी होळी यांना दुकान सुरू ठेवण्यासाठी निवेदन देण्यात आले. त्यावरून आमदार साहेबांच्या नेतृत्वात मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली व त्यांना निवेदन दिले
माननीय जिल्हाधिकारी यांनी आठवड्यातून दोन दोन दिवस ऑड-इन-वन पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्यात येणार असून सोमवार या दिवशी सर्व अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याची परवानगी राहील. तर मंगळवार बुधवार काही दुकाने तर गुरुवार शुक्रवार अन्य दुसरी दुकाने असे दोन दोन दिवस दुकानांना सुरू ठेवण्याची परवानगी असेल असे सांगितले यावर व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे