कोविड बाधीतांच्या नातेवाईकासाठी भाजपची नमो भोजन व्यवस्था 20 दिवसा पासून अविरत सुरू

133

कोविड बाधीतांच्या नातेवाईकासाठी भाजपची नमो भोजन व्यवस्था 20 दिवसा पासून अविरत सुरू

गडचिरोली :-
भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार अशोक नेते यांच्या माध्यमातून कोविड बाधीत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी गेल्या 20 दिवसापासून मोफत नमो भोजन व्यवस्था अविरत सुरू आहे. लॉकडाऊन मध्ये हॉटेल्स, भोजनालय बंद असल्याने दवाखान्यातील रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची अडचण होत होती. याची जाण ठेवून खासदार अशोक नेते यांनी सामाजिक भावनेतून सेवा कार्य म्हणून नमो भोजन व्यवस्थेची सुरुवात केली. 20 दिवसापासून रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत भोजन दिल्या जात आहे. काल दि 4 जून रोजी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन दान करण्यात आले. यावेळी आदिवासी मोर्चा चे प्रदेश संघटन महामंत्री प्रकाशजी गेडाम, शहर महामंत्री विनोद देवोजवार, भाजयुमो चे शहर अध्यक्ष सागर कुमरे, अल्पसंख्याक मोर्चा चे शहर अध्यक्ष सलीम शेख, शहर महामंत्री इमरान शेख, भाजपचे दत्तूजी माकोडे, झोपडपट्टी आघाडी चे श्यामजी वाढई, व भाजपा चे पदाधिकारी उपस्थित होते.