Home गडचिरोली शिवसेना जनसंपर्क कार्यालय, अहेरी येथे शिवराज्यभिषेक सोहळा जल्लोषात साजरा

शिवसेना जनसंपर्क कार्यालय, अहेरी येथे शिवराज्यभिषेक सोहळा जल्लोषात साजरा

141

अहेरी:- आज रोज रविवार ला शिवसेना जनसंपर्क कार्यालय अहेरी येथे श्री रियाज शेख, उपजिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली तथा अरुणभाऊ धुर्वे, विधानसभा प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितेखाली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार, हळद कुंकू अगरबत्ती लावून मानवंदना करून शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या थाठामाठात जल्लोषात साजरा करण्यात आला. तसेच शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर तथा राज्याभिषेकावर श्री धुर्वे यांनी व्याख्यान केले. सदर कार्यक्रमात पुढील प्रमाणे शिवसेना पदाधिकारी तथा शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते. अहेरी विधानसभा संघटक श्री बिरजूभाऊ गेडाम,वरिष्ठ शिवसैनिक श्री विलास पोचमपल्लीवार, अहेरी तालुका संघटिका सौं. तुळजाताई तलांडे, उपतालुका संघटिका श्रीमती सपना ईश्वरकर, अहेरी उपतालुकाप्रमुख श्री प्रफुल येरणे,अहेरी शहर प्रमुख महेश मोहुर्ले , अक्षय करपे, राजू येनगंटीवार, विनय धुर्वे हे शिवसैनिक सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी महाराष्ट्र गीत तथा राष्ट्रगीताने समारोपाने करण्यात आले.

Don`t copy text!