बुर्गी ग्रामपंचायत अंतर्गत अबनपल्ली येथील सिमेंट कांग्रेट रस्त्याचे भूमिपूजन

189

सिमेंट कांग्रेट रस्ता मंजूर केल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांचे गावकऱ्यांनी केले अभिनंदन

एटापल्ली: ग्रामपंचायत बुर्गी अंतर्गत मौजा अबनपल्ली येथे जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजवल नागुलवार सचिव अदिवासी विद्यार्थी संघटना यांच्या नेतृत्वाखाली सरपंच विलास गावडे यांच्या हस्ते अबनपल्ली येथील सिमेंट कांग्रेट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य उमेश गावडे,गणेश गावडे,अबनपल्ली येथील भूमिया संदीप उसेंडी, पोलीस पाटील
उसेंडी, लालसू गावडे,महारु उसेंडी यांचेसह अबनपल्ली येथील नागरिक उपस्थित होते.
अबनपल्ली येथे सिमेंट कांग्रेट रस्ता मंजूर केल्याने गावातील नागरिकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे अभिनंदन केले आहे.