राजभवनला घेराव आंदोलनात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ता पदाधिकारी सहभागी होणार……….
जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांची माहिती……
गडचिरोली :- केंद्रातील भाजप सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी बांधव संघर्ष करत आहे.शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे काळे कायदे रद्द करावे व इंधन दरवाढ मागे घेण्याबाबत अखिल भारतीय काँग्रेस व युवक काँग्रेस कमेटीच्या सूचनेनुसार *किसान अधिकार दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.त्या नुसार शेतकऱ्यांच्या मागण्याच्या पाठिंबा देत इंधन दरवाढ मागे घ्यावी या मागण्यांसाठी शनिवारी दि.16 जानेवारी 2021 रोजी दुपारी12.00 वा.राजभवनाला (नागपूर) येथे घेराव घालण्यासाठी मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चा चे नेतृत्व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मा.ना. श्री.बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा.सत्यजित दादा तांबे यांच्या उपस्थितीत होत आहे तरी गडचिरोली जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी,विधानसभा कमेटी,तालुका कमेटी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आव्हान जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केलेले आहे.






