आष्टी येथील वैनगंगा नदीच्या पुलावरून तेंदूपत्ता वाहतूक करणारा ट्रक कोसळला.

161

दोन जण जागीच ठार

आष्टी:- 
आष्टी येथील वैनगंगा नदीच्या पुलावरून तेंदूपत्ता वाहतूक करणारा ट्रक कोसळून एक दोन जण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे की एम एच 34 BG 6111 क्रमांकाचा तेंदूपत्ता वाहतूक करणारा ट्रक आष्टीवरून चंद्रपूरच्या दिशेने जाताना चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने तो नदीत कोसळला.यात चालक कमलेश सलविंदर सलूजा व क्लिनर नितीन दिलीप बिके रा. किसाननगर हे दोघेही जागीच ठार झाले. तर या वाहनात बसून असलेला मजूर अजय कारपेनवार हा किरकोळ जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.सदर ट्रक हरमन ट्रान्सपोर्ट बल्लारपूर यांच्या मालकीचा असून तो सिरोंचा तालुक्यातील बामणी येथून बल्लारपूर कडे निघाला होता. सदर अपघाताची माहिती कळताच आष्टी पोलीस घटनास्थळी धाव घेऊन मृतक चालक व क्लिनर यांना बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविले. तर जखमी मजुराला रुग्णालयात दाखल केले.या घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे.