एटापल्ली:- ग्रामपंचायत सेवारी अंतर्गत येणाऱ्या सेवारी , कमके , कुकेली , दुस्सागुडा या गावांमधे आज दिनांक 20/06/2021 रोज रविवारला कोविड-19 लसीकरण बाबत गावांगावांत जाऊन गृहभेटी व चौकाचौकात जाऊन जनजागृती करण्यात आली.व लसीकरणासंबंधी चे लोकांमधे असलेली अफवा व गैरसमज दुर करण्यात आली.तसेच कोरोना च्या तिसऱ्या लाटेपासुन वाचायचे असल्यास लस घेणे आवश्यक आहे हे लोकांना समजावुन सांगण्यात आले.या प्रसंगी नोडल अधिकारी मा.म्हशाखेत्री सर , (केंद्रप्रमुख कसनसुर) ,सरपंच सौ.ललिताताई गोटा , पोलिस पाटील , ग्रामसेवक श्री.मनोज गेडाम , ग्रामपंचायत अंतर्गत शाळा कमके चे मुख्याध्यापक श्री.बारसागडे सर , कुकेली चे मुख्याध्यापक श्री.पारधी सर , दूस्सागुडा चे मुख्याध्यापक श्री.निकोडे सर ,ईतर शिक्षक वृंद , आरोग्य विभागाचे कर्मचारी , अंगणवाडी सेविका , आशा वर्कर , आदी मान्यवर उपस्थित होते.