गडचिरोली,(जिमाका)दि.29 : गडचिरोली जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरण मोहिम आय.डी.ए. दिनांक 01 जुलै ते 15 जुलै या कालावधीत राबविण्यात येत असल्यामुळे या अंतर्गत जनतेला डी.ई.सी., आयवरमेक्टीन, आलबेडांझोल, गोळ्यांचे सेवन प्रत्यक्ष आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष करावयाचे असल्याने या मोहिमेचा शुभारंभ आज, दि. 29 जून 2021 रोजी जिल्हाधिकारी, गडचिरोली दीपक सिंगला यांचे दालनात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली कुमार आशिर्वाद, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, गडचिरोली समीर शेख यांचे उपस्थितीत करण्यात आला. एक दिवसीय समुळ उपचार मोहिमेचे औषध डी.इ.सी., आयवरमेक्टीन, आलबेडांझोल गोळ्यांचे सेवन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी समक्ष करुन जिल्ह्यातील समस्त जनतेला गोळया आरोग्य कर्मचाऱ्यासमक्ष सेवन करुन हत्तीरोग दुरीकरण मोहिमेला शतप्रतिशत सहकार्य करण्याचे आवाहन केले.