कोरोनामूळे मृत आरोग्य सेवकाच्या कुटूंबाला विम्याचे ५० लक्ष मिळाले

202

गडचिरोली, दि.02, जिमाका :- कोरोना महामारी दरम्यान कोरोना संसर्गामूळे आरोग्य सेवेत कर्तव्य बजावत असताना जिल्हयातील हरिराम ढोंगे आरोग्य सेवक यांचा मृत्यू दि.21 सप्टेंबर 2020 रोजी झाला होता. शासनाच्या प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेंतर्गत त्यांच्या कुटुंबियांकडे विम्याचे 50 लक्ष रूपये जमा झाले आहेत. मृत हरिराम ढोंगे हे मार्कंडादेव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे कार्यरत होते. हे उपकेंद्र आमगाव महाल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आंतर्गत येते. शासनाकडून आरोग्य विभागातील कोरोना योद्ध्यांना मृत झाल्यास त्यांच्या कुटुंबांना अर्थिक स्वरूपात विम्याद्वारे 50 लक्ष रूपये मदत दिली जाती. मृत व्यक्तीचे कुटुंब हे विम्याची रक्कम मिळालेले जिल्हयातील पहिलेच लाभार्थी आहेत.
हरिदास ढोंगे यांचा विमा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासन स्तरावर पाठविण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ.पंकज हेमके यांनी याबाबत प्रस्ताव तयार करण्यापासून ते विविध त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी यासाठी मार्गदर्शन केले होते.