भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम अतिसंवेदनाशिल नेलगुंडा गांवात दौरा

232

▪️गावाच्या निर्मितीनंतर गांवात येणारे पहिले जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार ◼️
▪️अतिदुर्गम गावांना सोईसुविधा उपलब्ध करून देणार ▪️ग्रामीण भागात दौरे करून समस्या जाणून घेणारे एकमात्र नेता ▪️
🔸 गावातील मूलभूत समस्या व नागरिकांचे समस्या जाणून घेतली▪️

भामरागड:- अतिसंवेदनशिल व आदिवासी बहुल असलेल्या गावातील नागरिकांना सोईसुविधा उपलब्ध करून देऊन विकासाचा मुख्य प्रवाहात आणण्याच दूरद्रुष्टी बाळगुन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार सम्पूर्ण जिल्हातील ग्रामीण भाग आजपावेतो लोकप्रतिनिधि व प्रशासन दुर्लक्ष करीत होता असे ग्रामीण परिसरात दस्तुरखुद त्याठिकाणी जावून समस्या जाणून घेत आहेत,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यापासून अनेक ग्रामीण भागात दौरे करून समस्यांचे निराकरण करत आहेत.
गडचिरोली जिल्हातील शेवटचं टोकावर वसलेल्या भामरागड तालुक्यातील नेलगुंडा येते दौरा करून समस्या जाणून घेतले आहे.अतिसंवेदनाशिल व आदिवासी बहुल क्षेत्र मात्र स्वांतत्रच्या ७२ वर्षानंतर पण या भागाच्या विकास झाला नाही.या भागात अनेक प्रमुख समस्या आवासुन उभे आहेत.या गावांना जाण्यास आजही पक्के रस्ते नाहीत,पुल,विज नाहीत,पिण्याचं पाण्याचा समस्या मात्र याकडे लोकप्रतिनिधी कडून दुर्लक्ष केले असल्याने अजूनही विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.
स्थानिक क्षेत्रातून निवडुन आल्यानंतर मात्र याकडे दुर्लक्ष करत असतात.मात्र या गांवात केव्हाच येत नाही समस्या जाणून घेत नाहीत मात्र श्री.अजयभाऊ कंकडालवार हे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष आहेत कि त्यांनी आम्हच्या गांवात आले आम्हच्या समस्या जाणून घेतले असल्याचे म्हणत अध्यक्ष आल्याच आनंद व्यक्त केले.
नागरिकांसोबत एक तास चर्चा करून समस्या ऐकून घेतले व निराकरण करून देण्याच्या ग्वाही देत म्हणाले या भागात अनेक समस्या आहेत नुसता निवडनूकीच्या वेळी अनेकाकडून आश्वासन दिले जातात मात्र ते पूर्ण करत नाहीत आपण या क्षेत्रातून निवडुन आलो नसलो तरी मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या नात्याने या भागातील समस्या प्राधान्याने सोडवण्याच्या प्रयत्न करू असे सांगताच नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी श्री.देवाजी पल्लो उपसरपंच नेलगुंडा,श्री .निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली, श्री.सुदाकर तीम्मा माजी सरपंच,लालसू आत्राम,मंगेश वड्डे ग्रा.प.सदस्य,वाले वड्डे माजी सरपंच नेलगुंडा,साधू मडावी,मंजा कनाके,मालू वरसे (भूमिया) ,पांडुरंग आत्राम,सायबी महाका,लालसू महाका,रामा महाका,मासु वड्डे,चुक्कु महाका,कुमा वेडदा,मंगरू वेडदा,लचू वाचामी तसेच गावातील बहुसंख्य नागरिक उपस्तीत होते.