जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे : नायब तहसिलदार श्री ए. पी. पिसाळ
खरीप हंगाम 2021 साठी 15 जुलैची अंतिम मुदत
वडसा :-शासनाने खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला असुन, या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत 15 जुलै आहे. याबाबत संबंधीत कंपनीकडून सुरू करण्यात आलेल्या जनजागृती प्रचार रथाला वडसा तालुका चे नायब तहसीलदार श्री. ए. पी. पिसाळ साहेब यांनी हिरवी झेंडी दाखविली. सदर योजना कर्जदार शेतकऱ्यांना व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा अधिसुचित खरीप हंगामातील पिकांसाठी 2 टक्के, नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आलेला आहे. . तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी विहित मुदतीपुर्वी नजीकच्या बँकेत अथवा आपले सरकार केंद्रावर विमा हप्ता आणि आवश्यक कागदपत्रांसह जाऊन आपल्या पिकाचे विमा काढून घ्यावे असे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे. प्रधान मंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार रथाचे हिरवी झेंडी दाखवताना उपस्थित श्री. एन. आय. गेडाम तालुका कृषी अधिकारी वडसा, श्री. एस. ए. थोटे कृषी अधिकारी पंचायत समिती वडसा, कु. शुभम दुधबळे पीएमएफबीवाय विमा प्रतिनिधी वडसा उपस्थित होते.







