नुकसानग्रस्त कुटूंबियांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांचा मदतीचा हात.
आष्टी:-
गेल्या आठवड्यात आष्टीजवळील ठाकरी येथे जोरदार वादळी पावसामुळे येथील घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोसाट्याचा वाऱ्यामुळे घरावरील टिनाचे पत्रे व इतर साहित्य उडून गेले..ऐन शेतीच्या हंगामात आलेल्या या अस्मानी संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नुकसानग्रस्त कुटूंबियांच्या मदतीसाठी आष्टीचे माजी सरपंच व शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी ठाकरी येथे जाऊन सत्यनारायण आचेवार, पुरुषोत्तम बोलकुंटवार,गजानन डोमटवार,डोंनय्या आसमशेट्टीवार, पांडुरंग जोरगलवार या नुकसानग्रस्त कुटूंबियांना आर्थिक मदत केली व आम्ही संकटकाळात खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहु असे नुकसानग्रस्त कुटूंबियांशी बोलताना मदतीचा धीर दिला.
ऐन संकटकाळी मदतीला धावून येऊन मदतीचा हात दिल्याबद्दल नुकसानग्रस्त कुटूंबियांनी राकेश बेलसरे यांचे आभार मानले. यावेळी प्रतिष्ठित नागरिक माजी पोलीस निरीक्षक वि.आचेवार साहेब, भाजप कार्यकर्ते दिवाकर मुत्तेवार,गणेश डोमटवार,दिलीप आकरेड्डीवार, गणेश खर्डीवार, नरेश माडेमवार,रवी आलचेट्टीवार, मंगेश पोरटे उपस्थित होते.