शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी अपघात ग्रस्तांच्या सहकार्यांना जेवण चारून माणुसकीचा धर्म पाळले!

187

जखमींच्या मदतीसाठी धावले व नंतर साथीदारांना जेवणही चारले
अहेरी:- धानाचा भुसा घेऊन एटापल्ली वरून आलापल्लीच्या दिशेने येणारे ट्रकचे मंगळवार 13 जुलै रोजी येलचिल पहाडीच्या वळणाजवळ ट्रक उलटल्याने ट्रक चालक नवनात शेंडे जागीच दगावले. तर ट्रकचे मजूर अनिल बावणे, मोरेश्वर कावळे, प्रकाश मंदाडे जखमावस्थेत तिथेच विव्हळत होते. दुपारी साडेतीनची घटना पण त्या रस्त्यावरून ये-जा करणारे कोणीच मदतीसाठी थांबले नाही.
शिवसेनेचे अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांना एक अनोळखी व्यक्तीने भ्रमणध्वनीवरून अपघाताची माहिती दिले. नेहमी रुग्णांच्या मदतीसाठी धडपड करणारे आलापल्ली येथील शिवसेनेचेच उपतालुका प्रमुख प्रफुल्ल येरणे यांना रियाज शेख यांनी सदरच्या अपघाताची व जखमावस्थेत काहीजण विव्हळत असल्याची माहिती सांगून कोणतेही वेळ न घालविता लगेच गाडी घेऊन त्यांना रुग्णालयात आणण्याचे सल्ला प्रफुल्ल येरणे यांना दिले.
आलापल्ली वरून अपघातस्थळ 15 किलोमीटरचे अंतर असून लागलीच प्रफुल्ल येरणे यांनी आपल्या स्वतःच्या मालकीचे चारचाकी वाहनाने टायगर गृपचे आदर्श केसलवार, अशोक मद्देर्लावार, मल्लेश आलाम, हसन खान या युवक मित्रांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. व जवळपास पाऊण तासा पासून जखमावस्थेत व रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत असणारे तिघांना गाडीत झोपवून सरळ अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींच्या रक्तस्त्रावामुळे प्रफुल्ल येरणे यांची गाडी व सीटसुद्धा पूर्णतः रक्ताने माखले.
लगेच रियाज शेख यांनी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात जखमींच्या मदतीला धावून हिंम्मत व धीर दिले आणि प्राथमिक उपचारापर्यंत रुग्णालयात थांबले.
एटापल्ली वरून मूलकडे धानाचा भुसा घेऊन जाणारे दोन ट्रक होते, पहिल्या ट्रकचे अपघात झाले. अपघातातील मृतक व तिघे जखमी आणि मागून भुसा घेऊन येणाऱ्या दुसऱ्या ट्रकचे मजूर सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सिमडा गावचे रहिवासी होते.
सर्व एकाच गावचे व एका साथीदाराचा जीव गेल्याने व तिघे जखमावस्थेत असल्याने दुसऱ्या ट्रकमधील मजुरांना साथीदारांच्या कठीण व संकटसमयी सोडून जाणे शक्य नव्हते. त्यातच मृतकाचे शवविच्छेदन करणेही बाकी होते, दिवसभर ट्रक मध्ये कोंडा (धानाचा भुसा)भरून आता सायंकाळी स्वतःचे पोट भरण्यासाठी दोन घासचे आवश्यकता होते, अलीकडे हॉटेलच्या वेळेतही बंधन आल्यामुळे पैसे देऊनही जेवण मिळणे मुश्किल होते. पुण्याईचे (सवाबचे)काम म्हणून रियाज शेख यांनी त्या सहा जणांना रात्रोच्या वेळी जेवण चारून माणुसकीचा धर्म पाळले.
साथीदार गेल्याचे दुःख व तीन साथीदार जखमी असतांना आणि आम्ही परगावचे असल्याने आधीच दुःखाचा भार होता, पण रियाज भाई यांची माणुसकी पाहून आम्ही भारावून गेलो व माणुसकीचे दर्शन घडल्याचे समाधान त्या मजुरांनी व्यक्त केले.