शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी केली दुर्धरआजाराने ग्रस्त दोन बालकांना आर्थिक मदत

169

शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी केली दुर्धरआजाराने ग्रस्त दोन बालकांना आर्थिक मदत

चामोर्शी-
तालुक्यातील ठाकरी येथील वडिलांचे छत्र हरपलेल्या धृप कर्डेवार व क्रिश कर्डेवार हे दोन सख्खे भावंड दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेल्याशिवाय पर्याय नाही.ही बाब शिवसेना उपजिल्हाप्रमुख यांना कळताच त्यांनी माणुसकीचा परिचय देत कर्डेवार कुटूंबियांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत दिली.तसेच रुग्णालयात कोणतीही अडचण आल्यास त्वरित संपर्क करण्यास सांगितले. व धीर दिला.यावेळी कर्डेवार कुटूंबियांनी राकेश बेलसरे यांचे आभार मानले.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे हे नेहमीच गोरगरीब,गरजू लोकांच्या मदतीला धावून येतात.संकटकाळी एका हाकेवर धावून येणारा माणूस अशी त्यांची ख्याती आहे.यावेळी सुद्धा त्यांच्यातील माणुसकीचा परिचय दिसून आला.

यावेळी कर्डेवार कुटूंबियाची भेट घेऊन मदत करताना ठाकरी येथील हनुमंतू जोरगलवार दिलीप आकरेड्डीवार, गणेश डोमटवार,सत्यवान तोटावार, विकास आचेवार मंगेश पोरटे आदी.उपस्थित होते.