आरमोरी:- पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभर शिवसंपर्क अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात येत असुन पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने,आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथे या शिवसंपर्क बैठकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला,जोगीसाखरा पळसगाव जिप क्षेत्रातर्गत जोगीसाखरा गणात ही बैठक जोगीसाखरा येथील समाजभवणात आयोजीत करण्यात आली होती,यात शेतकरी शेतमजूर,कामगार यांच्या समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले,घर तेथे शिवसैनिक व गाव तिथे शिवसेना ही संकल्पना राबविण्याचे ठरले,शेतकऱ्यांना अजूनही महामंडळा त दिलेल्या धानाचे पैसे मिळाले नाहीत,शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले। या शिवसंपर्क बैठकीला जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांच्यासह जेष्ठ नेते माजी सभापती शेखर मने,उपजिल्हाप्रमुख भरत जोशी,माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम,युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख चंदू बेहरे,महिला संघटीका हेमलताताई वाघाड़े,माजी जिप सदस्या वेणूताई धावगाये,उपजिल्हाप्रमुख अश्विनीताई चौधरी,नगरपरिषद सभापती सागर मने,माजी तालुकाप्रमुख माणिक भोयर,भूषण सातव, सौ.मेघा मने, सौ.सारिका कांबळे,शैलेश चिटमलवार, श्री साठे वकील साहेब,अक्षय चाचरकर उपस्थित होते।शिवसंपर्क बैठकीला जोगीसाखरा, पातरगोटा,पळसगाव, कासवी,परिसरातील शिवसैनिक हजर होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजुभाऊ ढोरे,रामदास डोंगरवार,लहानुजी पिलारे,शैलेश ढोरे,रविशंकर ढोरे,सतीश गुरनुले सरपंच कासवी,कैलास डोनाडकर,सोपानदेव गेडाम,रामटेके बाबु,गुरुदेव स्टीबावणे,हरिओम ठाकरे,उल्हास बनपूरकर,प्रवीण ढोरे,मंगेश ठाकरे,अंकुश मैन, हिमांशू राऊत,पुरुषोत्तम मैन यांनी परिश्रम घेतले.