वाठाऱ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

200

या धडकेबाज कारवाईबदल वाठार पोलिसांचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कौतुक केले.

प्रतिनिधी: संभाजी पुरी गोसावी :-

वाठार पोलिसांनी जबरी चोरीचे गुन्हे उघड करुन 6 तोळे दागिने व मोटार सायकल असा एकुण 300000 रु, लाख रुपये किंमतीचा मद्देमाल जप्त करण्यांत वाठार पोलिसांना यश आले. याबाबत मिळालेली माहिती अशी की वाठार पोलिस स्टेशन हदिंत लोणंद ते सातारा जाणारे रोडच्या जवळ असलेले वाग्देव हायस्कुल जवळ दिनांक 13 रोजी 16 .00 वाजेच्या सुमारास दोन इसमांनी एका माहिलेच्या घरात घसुन तिच्या मुलीस चाकुचा धाक दाखवुन त्यांच्याकडील सोन्यांचे दागिने घेवुन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याबाबत अनोळखी दोन इसमाविरूदध गुन्हा दाखल करण्यांत आला. जबरी चोरीच्या गुन्हा उघडकीस आणुन सदरची जबरी चोरी करणारी टोळी वाठार पोलिसांनी अखेर जरेबंद केले . त्यांच्याकडुंन 6 तोळ्यांचे सोन्यांचे दागिने व मोटार सायकल असा सुमारे एकुण 3,00,000 रु. लाख रुपये किंमतीचा मद्देमाल हस्तगत करण्यांत आला. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल सो . अप्पर पोलिस अधीक्षक श्री . धीरज पाटील . उप विभागीय पोलिस अधिकारी श्री. गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलिस स्टेशनचे वारिष्ठ पोलिस निरीक्षक श्री .स्वप्निल घोगडे व पोलिस उप निरीक्षक श्री.महेश पाटील, पो. हवालदार केंजळे, तानाजी चव्हाण, पो.ना.राहुल मोरे आदिं पोलिस कर्मचारायांनी या कारवाईत सहभाग घेतला या धडकेबाज कारवाईबदल वाठार पोलिसांचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कौतुक केले.