बँक ऑफ महाराष्ट्र चामोर्शिच्या बँक व्यवस्थापकाचा पीक कर्ज देण्यास टाळाटाळ
येणापूर:- 2021 – 22 च्या शेती हंगामासाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडे अनेक शेतकऱ्यांनी शेत पिकाच्या कर्जाची मागणी केलेली होती.मात्र वारंवार पीक कर्जाची बँक व्यवस्थापक यांच्याकडे मागणी करूनही शेतकऱ्यांच्या हाती फक्त उपेक्षाच येत आहे शिवाय व्यवस्थापक असभ्य वर्तनाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शेतीचा हंगाम चालू आहे गेल्यावर्षी पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांचे उत्पन्न झाले नाही.त्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. माहे मार्च 2021 ला तालुक्यातील शेतकऱ्यांनी जुन्या कर्जाची रक्कम भरलेली होती त्यानंतर वर्ष 2021- 22 च्या शेती हंगामासाठी अर्ज देखील केलेला होता मात्र बँक ऑफ महाराष्ट्र चे बँक व्यवस्थापक यांच्याकडून शेतकऱ्यांना केवळ अरेरावीची भाषा, उद्धट बोलणे, शेतकऱ्यांना हिनविने अशा स्वरूपाचे वर्तन घडून येत आहे.
चामोर्शि हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे परिसरातील अनेक गावांमधून शेतकऱ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये कर्जाची मागणी केलेली आहे. अनेक वेळा बँकाच्या पायऱ्या चढून, पायपीट करून देखील शेतकऱ्यांच्या हाती फक्त बँक व्यवस्थापक यांनी केवळ तुरीच दिलेल्या आहेत शिवाय बोनस म्हणून अपमानास्पद शब्द दिलेले आहेत.
संपूर्ण देशामध्ये खासगीकरणामुळे अनेकांचे हाल झालेले आहेत. मोठ्या श्रीमंतांनाच कर्ज मिळतो आहे पण कृषिप्रधान असलेल्या देशात शेतकऱ्यांनाच पिक कर्ज जर मिळत नसेल उलट त्याला अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागत असेल तर मग शेतकऱ्यांनी पहावे तरी कुणाकडे? ह्या बँका बड्या उद्योगपतीसाठीच आहेत की शेतकऱ्यांसाठी देखील काम करणार आहेत असा प्रश्न सर्वसामान्यांना व शेतकऱ्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.
बँकांच्या नियमानुसार अग्रक्रम क्षेत्रातील 18 टक्के बँकांचा निधी हा शेतीसाठी खर्च करणे आवश्यक आहे मात्र जर तो त्यांना दिला जात नसेल तर शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना त्यांचा न्याय मिळवून द्यावा त्याबरोबरच शेतकऱ्यांसोबत असभ्य वर्तवणूक करणाऱ्या बँक व्यवस्थापक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी नामदेव वैरागडे, मिराबाई रायसिडाम, जावराबाई बांबोडे, पुरुषोत्तम बोरीकर, डोमदेव सातपुते,भास्कर दुधबडे, रेखाबाई सातपुते, रेखाबाई पोरटे, विनायक लोधे, सिंधुबाई दुधबडले, धर्मराव सातपुते, सुमित्रा सोमनकर आदी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.