शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांची पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी.
आष्टी-
आष्टी येथील सामान्य रुग्णालयात 108 क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी गडचिरोली जिल्ह्यचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन देऊन केली.
आष्टी हे गाव गडचिरोली जिल्ह्यचे मध्यवर्ती ठिकाणी आहे.तसेच तेदक्षिण व उत्तर गडचिरोली ला जोडणारे महत्वाचे ठिकाण आहे. इथे एक सामान्य रुग्णालय असून या रुग्णालयात 70 गावातील लोक उपचारासाठी येतात.ज्या रुग्णाची प्रकृती गंभीर असते अशा रुग्णांना चंद्रपूर व गडचिरोली ला रेफर केले जाते.आष्टी गावावरून चंद्रपूरचे अंतर 80 किलोमीटर व गडचिरोली चे अंतर 70 किलोमीटर आहे. त्यामुळे इथे रुग्णवाहिकेची सोय नसल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना खाजगी वाहनाने रुग्णांना न्यावे लागते.या ग्रामीण भागातील बहुतांश लोकसंख्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्याने चंद्रपूर व गडचिरोली येथे रुग्णांना नेण्यासाठी त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी चंद्रपूर व गडचिरोली येथील रुग्णालयात गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांना त्वरित नेण्यासाठी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची नितांत गरज आहे. या बाबीची दखल घेऊनआष्टी सामान्य रुग्णालयाला एक 108 क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी की जेणेकरून आष्टी परीसरातील रुग्णांना फार मोठा दिलासा मिळेल.व त्वरित उपचार मिळणे सोयीस्कर होईल.अशी मागणीही त्यांनी पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.