जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या पाठपुरावा केल्याने मिळाली रुग्णवाहिका
एटापल्ली: तालुक्यातील बुर्गी येथे माजी आमदार दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली आविस सचिव प्रजवल नागुलवार यांच्या नेतृत्वाखाली सरपंच विलास गावडे यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण उदघाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी सरपंच तलांडे,सरपंच विलास गावडे,व वैद्यकीय अधीकारी डॉ. सचिन कनाके यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे मागनी केली असता जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी पाठपुरावा करून बुर्गी प्रा.आ.केंद्राला नविन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिले. गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.यावेळी ग्रा. पंचायत सदस्य गणेश गावडे,सरपंच कैलास उसेंडी,पोलीस पाटील हिचामी,भूमिया तुला हिचामी व गावकरी कर्मचारी उपस्थित होते.