गडचिरोली जिल्ह्यातील बँकाचे कामकाज नियमित वेळेनुसार सुरू

177

गडचिरोली, (जिमाका) दि.06 :- जिल्हा अग्रणी बँक, गडचिरोली यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व बँकाचे ग्राहक सेवा व्यवहाराबाबतचे कामकाज नियमित वेळेप्रमाणे 100 टक्के उपस्थितीसह सुरू ठेवण्याबाबत विनंती केलेली होती. व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, गडचिरोली यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार सदर आदेशाचे दिनांकापासून ते पुढील आदेशापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व बँकाचे ग्राहक सेवा व व्यवहाराबाबतचे कामकाज हे नियमित वेळेनुसार 100 टक्के उपस्थितीसह सुरू राहतील, अशी परवानगी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,गडचिरोली यांनी दिली आहे.