कुरखेडा:-
तालुक्यातील गेवर्धा फिडर अंतर्गत जवळपास 17 ते 18 गावांना फक्त 8 तासच वीज पुरवठा केल्या जात असल्यामुळे शेतकऱ्यांना खूपच मानसीक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे, आठ तासाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचवता येत नाही,
सध्या वरून राजाही शेतकऱ्यांवरच कोपलेला आहे व वीज पण बरोबर मिळत नसल्यामुळे अन्नदाते असलेले शेतकरी हे दुहेरी संकटात सापडलेले असून कित्येकांचे रोवणे अडकलेले आहेत,तर ज्याचे रोवणे झाले त्यांचे रोवणे सुकत आहेत,ही बाब जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांच्या ध्यानात आल्यामुळे त्यांनी आज दि 7 आगस्ट 2021 ला महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री,तथा गडचिरोलीचे पालकमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन शेतकऱ्याच्या या समस्येबाबद सविस्तर चर्चा केली,
माननीय पालकमंत्री यांनी ताबडतोब महावितरणचे व्यवस्थापक श्री सिंघेल मुंबई यांच्यासोबत दुरधवनी वरून चर्चा केली व श्री सिंघेल यांनी सकारात्मक रीत्या ही समस्या सोडविण्याचे कबूल केलेले आहे।
लवकरात लवकर शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा केल्या जाईल असा जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांना विश्वास असुन लवकरच महावितरण चे व्यवस्थापक श्री सिंघेल यांची मुंबई येथे भेट घेणार असल्याचे त्यांनी कळविले आहे, या प्रसंगी माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम हजर होते।