शाळांच्या व शिक्षक यांच्या समस्या आनलाईन पद्धतीने निराकरण करा : संतोष सुरावार
चामोर्शी :- जिल्ह्यातील शाळांच्या व शिक्षक ,लिपिक यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी गडचिरोली येथे नेहमी जावे लागते त्यामुळे विनाकारण शाळा तसेच शिक्षक व लिपिक यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असतो त्यामुळे सदर विभागाअंतर्गत समस्यांचे निराकरण आनलाईन पध्दतीने करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गडचिरोली जिल्ह्य अध्यक्ष संतोष सुरावार यांनी शिक्षण उपसंचालक नागपूर याना दिलेल्या निवेदनातून केली आहे .
निवेदनात म्हटले की ,गडचिरोली जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे शिक्षणाधिकारी कार्यालय ,वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय ,लेखाधिकारी कार्यालय गडचिरोली हे शाळा कार्यालयपासून खूप अंतरावर आहे ये – जा करण्यासाठी वाहतूक साधनांची पुरेपूर सुविधा नाही त्यामुळे जिल्ह्यातील मुख्याध्यापक ,लिपीक व शिक्षक यांना जिल्हा कार्यालयात प्रस्ताव दिल्यानंतर तृट्याचे निराकरण करण्यासाठी हार्ड कापी चा आग्रह न करता प्रस्ताव ई – मेलद्वारे स्वीकारले जावे शुल्लक कारणासाठी थकीत वेतन ,शालार्थ इत्यादी कामांसाठी कर्मचाऱ्यांना जिल्हा कार्यालयात ये – जा करावी लागते यामुळे समस्याचे निराकरण लवकर होत नाही शिक्षक आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून प्रत्येक जिल्हा कार्यालयास संगणक व प्रिंटर संच उपलब्ध करून दिले आहेत त्याचा सदुपयोग करावा जेणेकरून कामे सुलभ होतील व समस्या तात्काळ निकाली लागतील यामुळे पैशाचा व वेळेचा अपव्यय होणार नाही तसेच भ्रष्टाचारावर बरेच नियंत्रण मिळवता येईल .
शासनाने ५जून २०२० रोजी निर्णय घेऊन एक परिपत्रक काढले आहे त्यात कोरोना विंषाणू प्रसारवरील प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू करण्यात आल्या आहेत त्याअनुषंगाने जास्तीतजास्त कामे ई – मेल ,व्हाट्सअप्प ,वापर करावा अशा सूचना त्या निर्णयात दिलेल्या आहेत त्या दृष्टीने पत्रव्यवहार व समस्या आनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार यांनी केली आहे .