भामरागड:- भामरागड हे ठिकाण पामालगौतमए इंद्रावती व पर्लाकोटा या नद्याच्या संगमाच्या काठावर वसलेले आहेत पावसाळा या ऋतूमध्ये वरील नद्याचे विस्तृत पाणी पसरत असते हे ठिकाण त्याच्या हिरव्यागार आणि घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहेत आपण येथे माडिया संस्कृती पाहू शकतो नैसर्गिक संसाधने व निसर्ग संपन्नतेचे नटलेल्या या प्रदेशात, पारंपारिक औषधी वनस्पती व त्यांचा उपयोग गोंड व माडिया लोंकाकडून केला जातो. म्हणून राजे विशवेष्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय भामरागड येथे भूगोल विभाग प्रमुख व आदीवासी विद्यार्थी यांकरीता सतत प्रयत्नशील असणारे प्रा. डाॅ. कैलास व्हि. निखाडे यांनी औषधी वनस्पती संवर्धन व उपयोग प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केला आहे. हे प्रमाणपत्र एकुण 30 दिवसांचे असून त्यामध्ये औषधी वनस्पतीचे उपयोग व संवर्धन करणे आणि रोजगाार प्राप्तीचे प्रशिक्षण देले जाणार आहे. हे प्रमाणचत्र निशुल्क आहे. ज्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. हेमराज लाड यांनी विद्यार्थीना प्रवेश करण्यासाठी आव्हान केले आहे. या प्रशिक्षणामुळे भामरागड व आजूबाजूच्या स्थानिक जमातींना रोजगार मिळवून देणे व आत्मनिर्भर बनविणे हा सुध्दा एक समर्पिम उध्देश आहे.