Home क्राईम जगत एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील इसमाची नक्षलवाद्यांनी केली हत्या.

एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील इसमाची नक्षलवाद्यांनी केली हत्या.

147

एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील इसमाची नक्षलवाद्यांनी केली हत्या.

गडचिरोली-

एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील इसमाची नक्षलवाद्यांनी काल दि.19 सप्टेंबरच्या रात्री हत्या केल्याची घटना समोर आली आहे.सोमाजी सडमेक वय वर्ष 45 रा. हेडरी ता. एटापल्ली जि गडचिरोली असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.आज सकाळच्या सुमारास सुरजागड मंदिरलगतच्या बोरिंग जवळ त्याचा मृतदेह आढळून आला.

काल दि.18 सप्टेंबर च्या रात्री मृतक सोमाजी सडमेक याला घरातून नक्षली घेऊन गेले.ही हत्या पोलीस खबरी असल्याचा संशयावरून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सुरजागड पहाडीवरील उत्खननाचा मुद्दा पेटत असतानाच ही हत्या झाल्याने बॅकफूट वर गेलेले नक्षली या परिसरात पुन्हा सक्रिय झाले असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Don`t copy text!