शनिवारी सायंकाळची दुर्घटना
सलमान मलिक असे वाहून गेलेल्या युवकाचे नांव
मूळचे उत्तरप्रदेशातील रहीवासी
अहेरी:- नजीकच्या वांगेपल्ली (प्राणहिता)नदीघाटावर फिरण्यासाठी तीन युवक अहेरी येथून गेले. पाण्यात तोल गेल्याने एक युवक वाहून गेला सदरची दुर्घटना शनिवारी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान घडली. पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे नाव सलमान मलिक असे असून वय वर्षे 20 असून मूळचे उत्तरप्रदेशातील मेरठ जवळील गुलावटी येथील रहिवासी आहे.
हे तिन्ही युवक मूळचे उत्तरप्रदेशाचे पण महाराष्ट्रात व अहेरी येथे व्यवसाय व वास्तव्यास असणारे फरमान मलिक यांच्याकडे डिझाइन कार्पेन्टरचे कामात मजूर म्हणून काम करायचे. विशेष म्हणजे वाहून गेलेला युवक सलमान हा मालक फरमान मलिक यांचा सखा साळा आहे.
शनिवारी सुट्टी होती त्यामुळे शदाब शरोब चौधरी (18), आसिम शेफिक (18) रा.गाझियाबाद उ.प्र. व सलमान मलिक (20) रा.मेरठ जवळील गुलावटी येथील हे तिन्ही युवक वांगेपल्लीच्या प्राणहीता नदीघाटावर फिरायला गेले. रिमझिम पावसामुळे हे तिन्ही युवक पुलाच्या खाली उतरले. मालक फरमान यांनी फोन करून अहेरीकडे येण्यास सांगितले. हो निघालो, येत आहोत असे म्हणत पाय धुण्यासाठी म्हणून नदीच्या किनाऱ्यावर गेले. सलमान याचा तोल गेल्याने सलमानला वाचविण्यासाठी आधी शदाब व शदाबला वाचविण्यासाठी आसिम शेफिक हे पाण्यात गेले. शदाब व आसिम कसेबसे पाण्याच्या सुखरूप बाहेर निघाले पण सलमान मलिक पाण्यात वाहून गेले. विशेष म्हणजे नदी पूर्णतः भरली असून प्रवाह अधिक आहे.
मालक फरमान यांचे फिरायला गेलेल्या युवकांशी काही मिनिटा अगोदर बोलणे झाले, पण नंतर कुठलाच संपर्क होत नसल्याने भयभीत होऊन वेळीच नदीकडे धाव घेतले असता दुर्घटना कळली. पण मूळचे ते उत्तर प्रदेशातील असल्याने व दुर्घटना ही तेलंगणा राज्याच्या टोकावर घडल्याने मालकाला काही सुचेनासे झाले व त्यांनी लगेच तेलंगणातील मानेपल्ली पोलीस स्टेशन कडे धाव घेतले.नेमके तिथेच वेळ वाया गेल्याने व माहिती मिळू न शकल्याने कुठलेच मदतीचे हालचाली करता आले नाही.
सदर दुर्घटनेची बाब सहज वांगेपल्ली पुलाकडे फिरायला गेले म्हणून आरोग्य विभागात कार्यरत असणारे हसरत पठाण व हिमायत शेख यांनी लगेच सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांना सांगितले.
स्वतः धाव घेऊन सुरेंद्र अलोने यांनी वेळीच अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे व अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांना कळविले. सीमा कुठली आहे याचे यत्किंचितही विचार न करता तात्काळ घटनास्थळी अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे आणि तहसीलदार ओंकार ओतारी यांनी धाव घेऊन मदत व बचाव कार्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण अंधार पडल्यामुळे व पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने अडथळा व धोका निर्माण होईल म्हणून पाण्यात बोट टाकणे शक्य नव्हते.रविवारी अगदी सकाळी बोट टाकून सलमान मलिक यांचे शोध घेण्यासाठी शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.