कोरची:- मागील वर्षभरापासून बोटेकसा कोरची ते पुराडा या मार्गावर फार मोठे मोठे खड्डे झालेले होते,या मार्गावरून दु, चाकी,चार चाकी,एसटी बस ने प्रवास करणाऱ्या प्रवाश्याना जीव मुट्टीत घेऊन प्रवास करावा लागत होता,कोणत्याही क्षणी अपघात होईल हे सांगता येत नव्हते,अनेक अपघात होऊन बरेच लोक जबर जखमी झालेले होते,अनेक संघटनांनी निवेदन देऊन सुद्धा बांधकाम विभागाचे दुर्लक्ष केले होते,
या गंभीर बाबीची दखल शिवसेना पदाधिकारी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल,माजी उपजिल्हाप्रमुख महेंद्र मोहबन्सी, उपजिल्हाप्रमुख भरत जोशी,उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रतवार, माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम,पुंडलिक देशमुख माजी सभापती,डॉक्टर नरेश देशमुख,अशोक गावतुरे, श्रीराम निंबकर,कृष्णा कावळे,राजू गुरूंनुले,यांनी घेऊन आठ दिवसात खड्डे बुजवा, अन्यथा कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता,यांना पुराडा ते बेळगाव,कोरची पर्यत पायी चालत नेऊन प्रवाशांना कसा त्रास होतो हे दाखवणार होते,परंतु बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या आंदोलनाची त्वरीत दखल घेऊन रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदार नेमला व कालपासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करून रस्त्याचे सपाटीकरण करणे सुरू केले आहे,
या कामामुळे परिसरातील जनतेनी शिवसेना पदाधिकाऱयांचे आभार मानलेले आहेत,
कोरची ते बोटेकसा या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम स्टेट बांधकाम विभागाचे असल्याने कार्यकारी अभियंता साखरवाडे यांचेशी चर्चा केली असता 22 ऑक्टोबर नंतर प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे ठोस आश्वासन जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांना दिले आहे,
आज शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल व पदाधिकारी यांनी मोक्यावर जाऊन कामाची पाहणी केली,व समाधान व्यक्त केलेले आहे।