जागतिक टपाल दिनानिमित्त पोस्ट मास्तर व कर्मचाऱ्यांचा सत्कार

82

युवती सेनेचा उपक्रम

भद्रावती:-
युवासेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे आणि युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई तथा युवासेना कार्यकारिणी सदस्य शितलताई सेठ यांचे निर्देशानुसार,नित्यानंद त्रिपाठी,कृष्णाताई गुजर व जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक दिनाचे औचित्य साधून येथिल टपाल कार्यालयातील पोस्ट मास्तर, पोस्टमन व कार्यरत कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू द्वारे सत्कार करून जागतिक टपाल दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी पोस्ट मास्तर तथा टपाल अधिकारी यांचेशी विविध समस्यांवर चर्च्या केली.यावेळी युवती उपजिल्हाधिकारी पूजा सराटे, शिवकुमारी गुडमल, नेहा बनसोड,शिवानी जोगी,सीमा लेडांगे, साक्षी खापणे, निकिता बोढाले,संध्या मेश्राम, मंजू गेडाम आदी युवती सेनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.