आलापल्ली:-दि १९आक्टोबर२०२१रोजी आलापल्ली येथील महेश ब्राईट इन्स्टिट्यूटच्या वरच्या मजल्यावर चाणक्य अकॅडेमी संलग्नित आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ तर्फे गरजू व होतकरू विध्यार्त्यांसाठी स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र व वाचनायलाचे उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा शुभहस्ते करण्यात आले.
आलापल्ली हे शहर अहेरी उपविभागात सगळ्या तालुक्याला जोडणारा मुख्य शहर आहे.येथे पाचही तालुक्यातील विध्यार्ती शिक्षणासाठी आणि विविध भरतीचे प्रशिक्षण व सराव करण्यासाठी ग्रामीण भागातील आलेले गरजू गरीब विध्यार्ती आलापल्ली येथे भाडयाने घर घेऊन मुक्कामी राहून अभ्यास करत आहेत.
मात्र या ठिकाणी शैक्षणिक सुविधेपासून विद्यार्थी वंचित आहे योग्य वेळी विध्यार्त्यांसाठी योग्य मार्गदर्शन मिडत नाही विध्यार्त्याना अतिरिक्त अभ्यास करून देखील यश मिडत नाही मैदानी शारीरिक सरावाकरीता प्रशिक्षक नाही.
हे सगळं लक्षात घेता चाणक्य अकॅडमी संलग्नित आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ तर्फे आलापल्ली येथे गरजू व होतकरू विध्यार्त्यांनकरिता स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र व वाचनालयाचे तसेच शारीरिक मैदानी सरावासाठी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण याचे उद्घाटन करण्यात आले.
चाणक्य अकॅडमी संलग्नित आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ तर्फे आलापल्ली येथे गरजू व होतकरू विध्यार्त्यांनकरिता स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र व वाचनालयाचा कार्यक्रमाला उद्घाटक जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,अध्यक्ष शंकर मेश्राम (सरपंच ग्राम पंचायत आलापल्ली) प्रमुख पाहुणे भास्कर तलांडे (सभापती पंचायत समिती अहेरी),जुगल बोंमनवार (चाणक्य अकॅडमी संचालक), पाटील सर (पोलीस उपनिरीक्षक),कांबळे सर(पोलीस उपनिरीक्षक)विजयजी खरवडे (अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी निर्मूलन समिती),चंद्रशेखर पांडे,मिलिंद खोंड,अतुल आत्राम हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन अमित येनप्रेड्डीवार हे तर प्रास्ताविक जुगल बोमनवार हे केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडळ चे सर्व सदस्य व पदाधिकारी हे होते.